Konkan railway : कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अंजनी ते चिपळूण दरम्यान ट्रॅकवर माती
konkan railway
1/8
कोकण रेल्वे ठप्प, कोकण रेल्वे मार्गावरील अंजनी ते चिपळूण दरम्यान ट्रॅकवर माती आली आहे.
2/8
मागील दीड तासापासून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
3/8
मुंबईहून येणारी मांडवी एक्सप्रेस खेड रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली आहे. इतरही गाड्या विविध स्थानकांवर थांबवल्या आहेत.
4/8
कोकण रेल्वेच्या वाहतुकीवरती फारसा मोठा परिणाम होणार नाही, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.
5/8
कोकणात मागील आठ दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सध्या मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे.
6/8
अंजनी चिपळूण दरम्यान माती ट्रॅकवर आली, कोणतीही मोठी आणि हानी नाही सर्व काही सुरक्षित
7/8
रेल्वे ठप्प झाल्यामुळे खेड स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.
8/8
पुढील सूचना येईपर्यंत खेड रेल्वे स्थानकात तिकीट विक्री थांबवली आहे..
Published at : 14 Jul 2022 03:36 PM (IST)
Tags :
Konkan Railway