Fish Theme Park : पाण्यातील विश्व... भारतातील पहिलवहिलं फिश थीम पार्क सिंधुदुर्गात सुरु
भारतातील पहिलंवहिलं फिश थीम पार्क उभारण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फिश थीम पार्कमध्ये नागरिकांना देशाविदेशातील विविध प्रकारचे मासे पाहायला मिळणार आहेत.
सावंतवाडी तालुक्यातील केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ग्लोबल ॲक्वेरिअम उभारण्यात आले आहे.
आज 11 सप्टेंबर रोजी या प्रकल्पाचा शुभारंभ झाला आहे.
फिश थीम पार्कमध्ये विविध प्रकारचे रंगीत मासे तसेच गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासे, देशविदेशातील माशांच्या प्रजाती यांचा पार्कमध्ये समावेश आहे.
याचा फायदा कोकणवासियांना तसेच महाराष्ट्रातील सर्वांना होणार आहे.
विशेष म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना यांचा फायदा मिळणार आहे या फिश थीम पार्कचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.
या फिश थीम पार्कमध्ये माशांना फीडिंग करण्याची व्यवस्था तसेच छोटेखानी तळेही निर्माण करण्यात आले आहे.
या तळ्यामध्ये मत्स्यप्रेमींना फिशिंगचा अनुभव मिळणार आहे.
या फिश थीम पार्कमध्ये सुमारे तीन हजार पाचशे विविध जातीचे मासे आपल्याला पाहायला मिळणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे.
हा जिल्हा निसर्गाच्या नवलाईने नटलेला आहेच, पण त्यासोबतच वॉटर स्पोर्ट्स आणि पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त असे इतर अनेक उपक्रम इथे राबवले जातात.
इथे जसं निसर्गसौंदर्य आहे, तसंच जैवविविधता ही बघायला मिळते.
निसर्गाच्या विविधतेने नटलेला भारताइतका दूसरा देश नसेल.