Konkan Rains : तळकोकणात दमदार पावसाची हजेरी, बळीराजा सुखावला

सिंधुदुर्गात सर्वदूर मान्सूनच्या धारा कोसळत असून बळीराजा सुखावला आहे.

Sindhudurg Rains

1/9
सिंधुदुर्गात सर्वदूर मान्सूनच्या धारा कोसळत असून बळीराजा सुखावला आहे.
2/9
यावर्षी पावसाने मृग नक्षत्र पहिल्यांदाच कोरडे घालवले.
3/9
मात्र काल सुरू झालेल्या आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ झाला आणि जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाने हजेरी लावली.
4/9
सकाळपासून जिल्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, मालवण तालुक्यात पाऊस पडत आहे.
5/9
पहिल्याच पावसाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पोलखोल केली आहे.
6/9
कणकवलीत चक्क या महामार्गामुळे सर्व्हिस रोडवर धबधबे वाहतानाचे चित्र दिसून आले.
7/9
पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.
8/9
पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्याचे दुबार पेरणीचे संकट टळले असून कोकणात शेतीच्या कामांना वेग येणार आहे.
9/9
दरम्यान तळकोकणात पावसाचा जोर आणखी वाढणार असून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Sponsored Links by Taboola