Deep Amavasya : दिव्यांनी कुणकेश्वर मंदिर लख्खं उजळलं, दीप अमावस्येनिमित्त दिव्यांची आकर्षक रोषणाई
सदाशिव लाड, एबीपी माझा
Updated at:
18 Jul 2023 06:37 AM (IST)
1
दीप अमावस्येनिमित्त सिंधुदुर्गच्या देवगडमधील कुणकेश्वर मंदिरात दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दक्षिण कोकणची काशी म्हणून कुणकेश्वर मंदिराची कोकणात ओळख आहे.
3
दीप अमावस्येच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या गाभाऱ्यात आणि पिंडीभोवताली दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती.
4
दिव्यांमुळे कुणकेश्वर मंदिर लख्खं उजळलं होतं.
5
आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात.
6
श्रावणाचा पवित्र महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमवस्या येत असल्याने दिव्यांची पूजा केली जाते.
7
अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतिक आहे.
8
त्यामुळे अनेक चांगल्या-वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे.