बोलावा विठ्ठल... पाहावा विठ्ठल; दगडावर साकारली विठुरायाची प्रतिकृती, अनोखं स्टोन आर्ट वेधतंय साऱ्यांचं लक्ष
आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातील विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तांची रिघ पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंधुदुर्गातील एका चित्रकारानं अनोख्या पद्धतीनं आषाढी एकादशी साजरी केली आहे.
आषाढी एकादशीचं औचित्य साधत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चित्रकार सुमन दाभोलकर यांनी स्टोन आर्ट साकारलं आहे.
चित्रकार सुमन दाभोलकर यांनी साकारलेलं स्टोन आर्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
कणकवलीच्या गदनदीत मिळणाऱ्या दगडावर रंगाची उधळण करत दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता विठ्ठलाचं स्टोनआर्ट साकारलं आहे.
समुन दाभोलकर यांनी आतापर्यंत अनेक स्टोनआर्ट साकारली आहेत.
दगडाला कोणताही आकार न देता नैसर्गिकरीत्या मिळणाऱ्या दगडावर रंगाची उधळण करत त्यांनी हे स्टोन आर्ट साकारलं आहे.
चित्रकार सुमन दाभोलकर यांनी दगडावर साकारलेलं विठ्ठलाचं गोड रुप पाहून अनेकजण भारावून जात आहेत.