सावळे सुंदर रुप मनोहर... वेगवेगळ्या रंगात रंगलेल्या तांदळापासून साकारलं विठु माउलीचं सोज्वळ रुप

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील कलाकारांच गाव असलेल्या नेरुर गावातील एका युवा चित्रकारानं विठ्ठलाचं सुंदर चित्र रेखाटलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
युवा कलाकाराने तांदळापासून विठ्ठलाची प्रतिकृती रेखाटली आहे.

युवा चित्रकार हर्षद मेस्त्री याने तांदूळ भाजून त्यापासून विठ्ठलाचं चित्र साकारलं आहे.
सर्वात आधी चित्रकार हर्षद मेत्री यांनी पांढरे तांदूळ चुलीवर विशिष्ट पद्धतीनं भाजले.
तांदळाला वेगवेगळे रंग येईपर्यंत त्यांनी तांदूळ भाजले.
भाजल्यानंतर तांदळाला वेगवेगळे रंग आले.
एका कागदावर विठ्ठलाचं चित्र रेखाटून त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे तांदूळ भरले.
विठ्ठलाच्या त्या सुंदर चित्रावरुन नजरच हटल नाहीये.
विठ्ठलाच सुंदर चित्र हर्षद मेस्त्री यांनी साकारलं आहे.
आज आषाढीनिमित्त पंढरपुरात लाखो वैष्णवांचा मेळा जमला आहे.