Shivjayanti : सिंधुदुर्गातील चित्रकाराने शिवकालीन नाण्यावर साकारले शिवरायांचे चित्र

राज्यात आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड गवाणे गावचे चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी शिवकालीन नाण्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र साकारले आहे.

शिवरायांचं चित्र साकारण्यासाठी त्यांनी अॅक्रेलिक रंगांचा वापर केला.
हे सूक्ष्म चित्र साकारायला त्यांनी भिंगाचा वापर केला आहे.
महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मतारखेवरुन दोन गटाचे दोन भिन्न मत असल्यामुळे शिवजयंती दोन वेळा साजरी केली जाते.
सरकारने शिवजयंती दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल, परंतु, फाल्गुन वद्य तृतीयेला देखील तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाईल असे जाहीर केले.
यंदा शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आज म्हणजेच 10 मार्च रोजी आहे.