Sighting Of Tigres With Cubs: आईने दरडवल्यानंतरही बछड्यांचा पाण्यातून बाहेर येण्यास नकार; नागपूरमधील वाघांची अफलातून मस्ती, PHOTO

Sighting Of Tigres With Cubs: उष्णतेची झळ सध्या मानवाबरोबर जंगलातील वन्य प्राण्यांनाही बसत आहे.

Sighting of tigres with cub

1/7
Sighting of tigres with cubs: नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील F-2 वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांचा तलावात पाण्यात मस्तीचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2/7
नागपुरातील वन्यजीवप्रेमी श्वेता अंबादे यांनी हा व्हिडीओ घेतला आहे. गोठणगाव गेटवर सफारी करताना त्यांनी हा व्हिडीओ चित्रित केला.
3/7
उष्णतेची झळ मानवाबरोबर जंगलातील वन्य प्राण्यांनाही बसत आहे.
4/7
उष्णता वाढल्यामुळे वन्य प्राणी देखील तलावात व एखादा पाणवठ्यावर पाण्यात बसून असतात.
5/7
F-2 वाघीण आणि तिचे बछडेही असेच पाण्यात मस्ती करत असल्याचे दिसत आहे.
6/7
उष्णता एवढी की वाघिणीच्या बछड्यांनाही पाण्यात डुबकी मारण्याचा मोह आवरला नाही. आईने दरडवल्यानंतरही बछडे पाण्यातून बाहेर यायला तयार नाही. नागपूरच्या उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातला वाघांचा अफलातून व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांना आकर्षण करतोय.
7/7
सध्या F-2 वाघीण आणि तिच्या 5 बछडे या अभयारण्यात पर्यटकांच्या आकर्षणच केंद्र ठरत आहे.
Sponsored Links by Taboola