Shiv Sena : नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची चर्चा
नाशिकच्या शिवसैनिकांनी आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, आगामी निवडणुका त्याशिवाय पक्ष संघटित राहावा यासाठी भेट नाशिक शिवसैनिकांनी घेतली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकचे 32 नगरसेवक आणि इतर असे एकूण 39 नगसेवकांनी यावेळी मातोश्रीवर उपस्थित होते. सर्व नगरसेवकांचे प्रतिज्ञापत्र या वेळी लिहून घेण्यात आले.
मालेगाव शहर आणि नांदगावच्या आमदारांनी बंड केल्यानं नाशिकच्या शिवसेनेत फूट पडलीय. त्यामुळे पक्ष सावरण्यासाठी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बंगल्यावर चर्चा केली
विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते म्हणाले, नाशिकची शिवसेना एकसंघ आहे. प्रतिज्ञापत्र देण्याची आवश्यकता खरं तर नाही मात्र कोर्टातली प्रक्रिया आहे म्हणून लिहून दिले आहे. आज मातोश्रीवर यायला मिळालं याचा आनंद आहे. ज्यांना निवडून दिलं ते गेले मात्र ज्यांनी त्यांना निवडून दिलं ते शिवसैनिक जागेवरच आहेत. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत उद्धव ठाकरे यांची हीच खरी शिवसेना आहे असं प्रतिज्ञापत्रात आम्ही लिहून दिलं. शिवाय आम्ही उद्धव ठाकरे यांना आमच्या शहरासाठी वेळ मागितला आहे.
नाशिक शहर, मालेगाव, इगतपुरी, सिन्नर, मनमाड या ठिकाणच्या शिवसैनिकांनी आज मातोश्री येथे उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
नाशिकचे 32 नगरसेवक आणि इतर असे एकूण 39 नगसेवकांनी यावेळी मातोश्रीवर उपस्थित होते. सर्व नगरसेवकांचे प्रतिज्ञापत्र या वेळी लिहून घेण्यात आले.