Sharad Pawar & Suresh Kalmadi: सुरेश कलमाडींनी विचारलं, हाऊ आर यू? शरद पवार म्हणाले, आय ॲम फाईन...

Sharad Pawar & Suresh Kalmadi: गेल्या अनेक वर्षांपासून कलमाडी सक्रिय राजकारणापासून दूर आहेत.काही दिवसांपासून ते आजारी असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Continues below advertisement

Sharad Pawar & Suresh Kalmadi

Continues below advertisement
1/7
एकेकाळी “सबसे बड़ा खिलाड़ी, सुरेशभाई कलमाडी” या नावाने ओळखले जाणारे कलमाडी पुण्यातील राजकारणाचे समानार्थी मानले जात होते. पुण्यातून दिल्लीपर्यंत त्यांचा प्रभाव होता.
2/7
1995 ते 2007 या काळात काँग्रेसमध्ये आणि पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांचा दबदबा प्रचंड होता. राजकीय वर्तुळात त्यांना ‘भाई’ म्हणून संबोधले जायचे. त्यांच्या एका शब्दालाही पुण्याच्या राजकारणात वजन होते.
3/7
मात्र 2010 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजन समितीचे अध्यक्ष असताना भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला.
4/7
पुण्याचे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री राहिलेले सुरेश कलमाडी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
5/7
सुरेश कलमाडी हे त्यांनी सुरू केलेल्या पुणे फेस्टिवल या कार्यक्रमाला सुद्धा यंदा उपस्थित राहिले नव्हते. याच दरम्यान काल पुणे दौऱ्यावर असणारे शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन सुरेश कलमाडी यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
Continues below advertisement
6/7
शरद पवारांना पाहतात सुरेश कलमाडी यांनी पवारांना 'हाऊ आर यु' असं विचारलं त्यावर पवारांनी कलमाडींना 'आय अँम फाईन' असं उत्तर दिले.
7/7
डॉ. धनंजय केळकर यांनी कालमाडी यांच्या तब्बेतीची सविस्तर माहिती शरद पवार यांना दिली. ही एक नियोजित भेट होती.
Sponsored Links by Taboola