पांडवगडावर इंदापूरमधील गिर्यारोहकांवर मधमाशांचा शॉकींग स्ट्राईक; 2 बेशुद्ध, 4 जखमी

सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील पांडवगडावर गिर्यारोहकांवर मधमाशांनी हल्ला चढवल्याने परिसरात व गडावर एकच खळबळ उडाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मधमाशांच्या अचानक झालेल्या या हल्ल्यात इंदापूरहून आलेले 4 गिर्यारोहक किरकोळ जखमी झाले असून दोघेजण घटनास्थळावर बेशुद्ध झाले आहेत.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूरवरुन गिर्यारोहक पांडवगडावर ट्रेकिंग करण्यासाठी आज सकाळी गेले होते, तेव्हा मधमाशांच्या पोळ्याने गिर्यारोहकांवर हल्ला चढवला.
गिर्यारोहकांनी लावलेल्या अत्तराच्या परफ्यूमच्या सुगंधाने मधमाशांचे पोळे विचलित झाले आणि यातूनच मधमाशांच्या पोळ्याने थेट गिर्यारोहकांवर हल्ला चढवला आहे.
मधमाशांच्या हल्ल्यात 6 गिर्यारोहक गंभीर स्वरूपात जखमी झालेले, त्यामध्ये दोन जण बेशुद्ध आहेत, गिर्यारोहक प्रशांत डोंगरे यांनी प्रशासनाला, आरोग्य विभागाला मदतीची हाक दिलेली आहे
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गडावरील इतर गिर्यारोहक जखमी व बेशुद्ध गिर्यारोहकांच्या मदतीला धावल्याचं दिसून आलं. सध्या बेशुद्ध गिर्यारोहकांची काळजी घेतली जा त आहे.
गिर्यारोहकांच्या अंगावर माशा चिकटलेल्या असून त्या माशांना काढण्याचं काम संबंधित मदतनीसांकडून केलं जात आहे. अद्यापही जखमींवर घरगुती उपाय केले जात आहेत.