Satara: सातारच्या धैर्याने माऊंट एलब्रुस केले सर, अवघ्या तेरा वर्षीय धैर्याची रेकॉर्डब्रेक कामगिरी

satara: धैर्याच्या या उत्तुंग कामगिरीचे आता सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

satara news

1/7
एव्हरेट बेस कॅम्प, किलोमंजारो,माऊंट एलब्रुस ही शिखरे म्हणजे गिर्यारोहकांसाठी आव्हानच असतात.परंतु ही तिन्हीही आव्हाने अवघ्या १३ वर्षी पार करण्याची आश्चर्यकारक कामगिरी साताऱ्याच्या धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिने साध्य केली आहे.
2/7
साताऱ्यातील धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिने. उणे १४ अंश सेल्सिअस तापमनात तब्बल ५ हजार ६४२ मीटर उंचीचे शिखर सर करण्याची किमया करत साताऱ्याची मान जगात उंचावली आहे.
3/7
साताऱ्यातील धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिने. उणे १४ अंश सेल्सिअस तापमनात तब्बल ५ हजार ६४२ मीटर उंचीचे शिखर सर करण्याची किमया करत साताऱ्याची मान जगात उंचावली आहे.
4/7
धैर्याचे वय अवघे १३ वर्षांचे असून, तिने युरोप खंड व रशिया येथील माऊंट एलब्रुस हे शिखर सर केले.
5/7
दोन मृत ज्वालामुखींपासून बनलेले हे शिखर असून, त्याची समुद्र सपाटीपासून उंची तब्बल ५ हजार ६४१ मीटर (१८ हजार ५१० फूट) एवढी आहे.सगळीकडे बर्फच बर्फ, अशा स्थितीतून धैर्याचा शिखर चढण्याचा प्रवास सुरु झाला.
6/7
पहिल्या दिवशी मिनरली ओडी या गावी पोहोचली. दुसऱ्या दिवशी आजाऊ येथे पोहाचत तिने ३ हजार मीटर उंचीचा ट्रेक चढाई केली. तिसऱ्या दिवशी बेस कॅम्प असलेले माऊंटन हंट येथे पोहोचली.
7/7
चौथ्या दिवशी ४ हजार ६०० ते ४ हजार ८०० मीटर इतकी उंची तिने सर केली. पाचवी दिवशी यशस्वी चढाई करत तिने माऊंट एलब्रुस शिखरावर तिरंगा फडकवला.
Sponsored Links by Taboola