पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरकडे पाठ, पर्यटकांनी धरली महाबळेश्वरची वाट; मिनी काश्मीरमध्ये गर्दी, चोख बंदोबस्त

पहलगाम हल्ल्यानंतर आता पर्यटकांनी काश्मीरकडे पाठ फिरवली असून आता महाबळेश्वरला पर्यटकांची पावलं वळू लागली आहेत.

Continues below advertisement

Mahabaleshwar

Continues below advertisement
1/8
थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर मध्ये सध्या पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
2/8
पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर आता महाराष्ट्राच्या पर्यटकांनी काश्मीरकडे पाठ फिरवली आहे. महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत.
3/8
राज्यभरात वाढलेला तापमानाचा उच्चांक आणि उष्णतेचा चटका आता असह्य होत असताना पर्यटकांची पावलं थंड हवेच्या जागांकडे वळली आहेत.
4/8
महाबळेश्वरमध्ये बोटींग करण्यासाठी अनेक पर्यटकांची पसंती आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने
5/8
सध्या महाबळेश्वर मध्ये पर्यटकांना पर्यटनाची वेगळी पर्वणी महापर्यटन महोत्सवामुळे घेता येणार आहे.
Continues below advertisement
6/8
महाबळेश्वरच्या बाजारपेठेतही पर्यटकांची खरेदीसाठी, नवनवे पदार्थ चाखण्यासाठी गर्दी होत आहे.
7/8
महाबळेश्वर नगरपालिका प्रशासनाने विविध पर्यटन पॉईंटवर काम करताना पाहायला मिळत आहेत.
8/8
मुख्याधिकारी योगेश पाटील हे देखील स्वतः उभे राहून उन्हाळी सुट्टीच्या अनुषंगाने पर्यटकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विशेष काळजी घेत असल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे.
Sponsored Links by Taboola