PHOTO : सज्जनगडावर बिबट्याचा बछडा आढळला, मध्यरात्री मादी आणि पिल्लाची भेट
साताऱ्यातील सज्जनगडावर मंगळवारी बिबट्याच्या बछड्याचे दर्शन झालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाल संध्याकाळच्या सुमारास सज्जनगडावरील रामघळ परिसरात काही तरुणांना बिबट्याचा बछडा खेळताना दिसला.
बिबट्याचा बछडा असल्याचं समजताच काही वेळात सज्जनगडावर गर्दी वाढली.
त्यानंतर तात्काळ वनअधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले.
अनेकदा सज्जनगडावर बिबट्याचा वावर असल्याचं सांगण्यात येत होतं. आता बिबट्याच्या बछड्याचं दर्शन झाल्यानंतर ही बाब अधोरेखित झाली आहे.
वनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बिबट्यावर देखरेख ठेवली.
डा इथे असल्याची जाणीव मादी बिबट्याला झाली. परंतु ती थेट इथे येऊन बिबट्याला घेऊन गेली नाही.
कर्मचाऱ्यांनी बछड्याला सुरक्षित ठिकाणी सोडलं. त्यानंतर मादी बिबट्या तिथे पोहोचली आणि बछड्याला घेऊन गेली.
मध्यरात्रीच्या सुमारास एका आईचं आणि तिच्या पिल्लाची भेट झाली.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याचा बछडा दिसला, परंतु मादी बिबट्या कुठेच दिसली नाही, त्यामुळे वनविभागाचे सहा ते आठ कर्मचारी सज्जनगड परिसरात तळ ठोकून होते.
त्यानंतर मध्यरात्री मादी बिबट्या तिथे आली आणि बछड्याला घेऊन गेली.