Satara Gold offer news: इन्स्टाग्रामवर 50 व्ह्यूज द्या अन् एक ग्रॅम सोनं मोफत मिळवा; साताऱ्यातील दुकानाबाहेर महिलांची तुफान गर्दी अन् पोलिसांची एन्ट्री

Satara Gold offer news: साताऱ्यातील ज्वेलर्सकडून सोनं मोफत देण्याची ऑफर, पण इन्स्टाग्रामवरील पब्लिसिटी स्टंट पडला महागात नेमकं काय घडलं जाणून घ्या सविस्तर

Continues below advertisement

Satara Gold offer news

Continues below advertisement
1/8
सातारा: सोशल मीडियावर केलेली सोन्याच्या दुकानाची अनोखी जाहिरात दुकानदाराच्या अंगलट आली; दुकानासमोर महिलांची गर्दी होऊन रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे दुकान मालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2/8
सातारा शहरातील गुरुवार पेठ परिसरात असणाऱ्या एका ज्वेलरी दुकानदाराने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या दुकानाची केलेली सोशल मीडियावरील अनोखी जाहिरात त्याच्या चांगलीच अंगलट आली आहे.
3/8
या जाहिरातीमध्ये दुकानाचा इन्स्टाग्राम पेज फॉलो करा आणि दुकानाची जाहिरातीची इमेज स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ठेवून त्याचे 50 व्ह्यू मिळाले की त्या महिलेला एक ग्रॅम मोफत फार्मिंग ज्वेलरी गिफ्ट मिळणार, अशी ऑफर देण्यात आली होती.
4/8
ही माहिती सातारा शहरात पसरल्यानंतर या दुकानासमोर मोठ्या प्रमाणात महिलांची अक्षरशः झुंबड उडाली. या जाहिरातीमध्ये पहिल्या 1000 येणाऱ्या महिलांना हे गिफ्ट मिळणार, असं लिहिलं होते.
5/8
मात्र, ऐनवेळी या परिसरात अचानक महिलांची गर्दी वाढल्यामुळे दुकानासमोर मोठी गर्दी झाली. या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. या योजनेची कोणतीही माहिती पोलीस स्टेशनला न दिल्यामुळे ही सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन संबंधित दुकान मालकाला ताब्यात घेतले.
Continues below advertisement
6/8
या प्रकरणात पोलीस प्रशासनाला कोणतीही माहिती न देता रस्त्यावर वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी मालकासह दोन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
7/8
मात्र, या प्रकरणात कोणीही फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली नसल्याचे स्पष्टीकरण यावेळी पोलिसांकडून देण्यात आले आहे.
8/8
सोशल मीडियावर केलेल्या या दुकानाच्या जाहिरातीची चर्चा शहरात चांगलीच रंगलेली पाहायला मिळाली.
Sponsored Links by Taboola