Jaykumar Gore Accident: चालकाचं नियंत्रण सुटलं, गाडी थेट 50 फूट दरीत कोसळली; अपघातात भाजप आमदार जखमी

BJP MLA Jaykumar Gore Accident: भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात. अपघातात जयकुमार गोरे जखमी, पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती.

BJP MLA Jayakumar Gore Car Accident

1/7
साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात जयकुमार गोरे जखमी झाले आहेत.
2/7
साताऱ्यातील फलटण येथे जयकुमार गोरेंच्या गाडीला अपघात झाला.
3/7
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय. मात्र, त्यांच्या बरगड्या आणि पायाला बराच मार लागल्याची माहिती मिळतेय.
4/7
नदीच्या पुलाला लावलेल्या तारा तोडून गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे.
5/7
जयकुमार गोरे मुंबईहून आपल्या घराकडे रवाना होत असताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात आमदार जयकुमार गोरेंसह इतरही तीन जण जखमी झालेत.
6/7
जयकुमार गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
7/7
अपघात झाला कशामुळे याची चौकशी सुद्धा पोलीस करत आहेत.
Sponsored Links by Taboola