Photo : महाबळेश्वरजवळ मजुरांचा टॅम्पो दरीत कोसळला, टॅम्पोत 50 मजूर
महाबळेश्वर येथील मुगदेव इथं मजुरांचा टॅम्पो दरीत कोसळल्याची घटना घडली. या टॅम्पोत सुमारे 50 कामगार असल्याची माहिती मिळत आहे.
Accident
1/9
महाबळेश्वर जवळच्या मुगदेव इथं मजुरांचा टॅम्पो दरीत कोसळला आहे. टॅम्पोत 50 कामगार असल्याची माहिती मिळत आहे.
2/9
हे सर्व मजूर मुंबईतून आल्याची माहिती मिळाली आहे. हे मजूर सातारा जिल्ह्यात कामासाठी जात होते. त्यावेळी महाबळेश्वरजवळ अपघाताची घटना घडली.
3/9
या टॅम्पोतील 15 मजुरांना बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती मिळते आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत.
4/9
जखमींमध्ये आठ महिन्याच्या गरोदर मातेचा देखील समावेश आहे. तसेच लहान मुलेही या अपघात जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
5/9
तळदेवच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमींवर उपचार सुरु आहेत. या जखमींमध्ये अनेक लहान मुलांचा समावेश आहे.
6/9
मजुरांच्या या टॅम्पोचा अपघात नेमका कसा झाला, याबाबतची माहिती अद्याप मिळाली नाही.
7/9
अपघाताची माहिती मिळताच मुगदेव येथील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते. ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढले.
8/9
मुगदेव येथील ग्रामस्थांनी अपघातात जखमी झालेल्यांना त्वरीत रुग्णालयात दाखल केले आहे.
9/9
महाबळेश्वर जवळच्या मुगदेव इथं मजुरांचा टॅम्पो दरीत कोसळला आहे. टॅम्पोत 50 कामगार असल्याची माहिती मिळत आहे.
Published at : 14 Jan 2023 12:52 PM (IST)