सांगली महापालिकेकडून रात्रीत स्वच्छता मोहिम; तब्बल 281 टन कचरा संकलित
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून दिवाळीत रात्रीच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलक्ष्मीपूजनदिवशी सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरात महापालिका कर्मचाऱ्यांनी रात्रभर स्वच्छता करीत तिन्ही शहरे स्वच्छ केली.
या विशेष मोहिमेमध्ये 281 टन कचरा हा संकलित करण्यात आला.
मनपा प्रशासक सुनील पवार यांच्या नियोजनानुसार आणि उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त वैभव साबळे उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम पार पडली.
विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये महापालिका क्षेत्रात रात्री नऊ ते एक या वेळेत महापालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावरील कचरा हा उचलण्यात आला.
रात्र सत्रामध्ये तिन्ही शहरात एकाच वेळी स्वच्छता झाल्यामुळे तसेच तिन्ही शहरांमध्ये तत्काळ कचरा उचलला गेला.
नागरिकांकडून महापालिका प्रशासनाच्या नियोजनाचे कौतुक होत आहे.
आरोग्य अधिकारी डॉ वैभव पाटील आणि आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र ताटे यांच्या नियंत्रणाखाली सांगलीत वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनूस बारगीर तर मिरज आणि कुपवाड परिसरात वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील यांच्यासह टीमने विशेष सहभाग घेतला.
रविवारी रात्री ते सोमवारी सकाळपर्यंत महापालिकेने 281 टन कचरा संकलन केले होते. यात 70 टन कचरा हा फटाके, फुले, दिवाळी साहित्यांचा होता.