Sangli News : सांगलीत ज्या चौकात जल्लोषात रामनवमी झाली त्याच ठिकाणी मुस्लिम कार्यकर्त्यांकडून मध्यरात्री सफाई
सांगलीमध्ये गुरुवारी रात्री उशिरापर्यंत राम भक्तांकडून जल्लोषात रामनवमी साजरी करण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरामनवमी साजरी होत असताना राम भक्तांकडून झालेल्या कचऱ्याची साफसफाई मुस्लीम कार्यकर्त्यांनी केली.
रामनवमी साजरी होत असताना राम भक्तांकडून झालेल्या कचऱ्याची साफसफाई मुस्लीम कार्यकर्त्यांनी केली.
सांगलीच्या राम मंदिर चौकात गुरुवारी रात्री साथीदार युथ फौंडेशनच्या वतीने रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. अगदी उशिरापर्यंत रामनवमीचा जल्लोष रंगला.
मध्यरात्रीस गर्दी संपली, आणि मागे रस्त्यावर ढिगभर कचरा झाला होता. तो पाहून रमजानच्या तराबीनंतर घरी परतणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यांचे हात सफाईसाठी सरसावले अन् पहाटे दोनपर्यंत परिसर चकाचक केला.
गुरुवारी दिवसभर साथीदार फौंडेशन आणि राम मंदिर चौक रिक्षा मित्रमंडळातर्फे भक्तीपूर्ण वातावरणात रामजन्मोत्सव साजरा झाला.
हजारो भाविकांनी रांगा लावून श्रीरामाचे दर्शन घेतले. सायंकाळी मुख्य कार्यक्रम उशिरापर्यंत रंगला. मध्यरात्री संपला, तेव्हा चौकात सर्वत्र कचरा पसरला होता.
भाविकांनी व कार्यकर्त्यांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, कागदाचे रंगीबेरंगी कपटे, उधळलेली फुले अशा कचऱ्यामुळे रस्ता माखून गेला होता.
महापालिकेचे सफाई पहाटे साफसफाई करणार होते, पण तत्पूर्वीच त्या रोडवरून जाणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यांना चौकातील कचरा दिसला.
यावेळी इन्साफ फौंडेशनच्या मुस्तफा मुजावर यांच्यासह अन्य काही जणांनी काही वेळात त्या ठिकाणी स्वच्छता सुरु केली.
मदतीला सावली बेघर केंद्रातील रहिवासी आणि इन्साफ फौडेशनच्या कार्यकर्त्यांना मदतीला घेतले.
मध्यरात्री बारापासून पहाटे सफाईनंतर चौकात कचऱ्याचा एकही कपटाही उरला नाही.
गोळा केलेला कचरा सकाळी महापालिकेच्या गाडीतून डेपोवर गेला.
रामनवमीच्या जल्लोषानंतर झालेला कचरा मुस्लिम कार्यकर्त्यांनी एकत्र येत गोळा केल्याने साथीदार ग्रुपच्या सदस्यांनी आणि रामभक्तनी देखील या मुस्लिम कार्यकर्त्यांचे आभार मानले.