PHOTO : कृष्णा नदीची पाणीपातळी स्थिर, यंदा मगरींच्या स्थलांतराला ब्रेक
सांगली जिल्ह्याच्या पलूस तालुक्यातील औदुंबर-भिलवडी-चोपडेवाडी नदीकाठी निसर्गप्रेमींना जवळपास दहा लहान मोठ्या मगरींचा अधिवास पाहायला मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया मगरींचा आकार साधारण सहा फुटांपासून ते तेरा चौदा फुटांपर्यंत आहे.
यंदा कृष्णा नदीची पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींच्या स्थलांतराला ब्रेक मिळाला आहे.
गेल्या काही वर्षांत 20 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान कृष्णा नदी पात्राबाहेर असल्याने पूरस्थिती असायची. अशावेळी मगरींना आजूबाजूला चरी, ओढे, वगळी शेतांमध्ये वावर पाहायला मिळायचा.
यंदा मात्र पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींनी आपला अधिवास सोडलेला नाही.
कृष्णा नदीच्या पात्रामध्ये अनेक ठिकाणी मगरींचा अधिवास आहे. कृष्णा नदी ही मगरींची नदी म्हणूनच ओळखली जाते.
सांगली जिल्ह्यात मगरीची आजही दहशत आहे. याच परिसरात अनेक वेळा मगरींकडून हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.