Sangli Rain : सांगलीत एका रात्रीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 8 फूट वाढ; चांदोलीत अतिवृष्टी
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सांगली जिल्ह्यात मोसमी पावसाने जोरदार सलामी दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचांदोली धरण परिसरात चोवीस तासांत 67 मिलिमीटर पाऊस झाला.यंदाची ही पहिलीच अतिवृष्टी आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे वारणा नदी दुथडी भरुन वाहत आहे.
दुसरीकडे सांगलीजवळ कृष्णा नदीतील पाणी पातळी देखील आता वाढू लागली आहे.
अद्याप कोयना धरणातून नदीत विसर्ग सुरु न केल्याने संथ गतीने वाढ सुरु आहे.
दरम्यान, आणखी काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता लक्षात एनडीआरफची एक टीम सांगलीत दाखल झाली आहे.
सांगली तब्बल दीड महिन्याच्या विलंबानंतर सुरु झालेल्या पावसाने जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे.
मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव आणि जत तालुक्याला वरदान ठरणार्या चांदोली धरणात पाणीसाठा 50 टक्के झाला आहे.
सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीची पाणी पातळी 15 फुटांवर पोहोचली आहे.
एका रात्रीत जवळपास 8 फुटांनी कृष्णा नदीची पातळी वाढली आहे.