Sangli Krishna River : कारखान्याचे मळीमिश्रीत सांडपाणी कृष्णा नदी पात्रात, प्रदूषण नियंत्रण मंडळ गांधारीच्या भूमिकेत
पाण्याचा पाट वाहतो अगदी तसे कृष्णा नदी पात्रात कारखान्याचे मळीमिश्रीत सांडपाणी नाल्यातून बिनधास्तपणे सोडले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाळवा तालुक्यातील कोळे गावाजवळ हा प्रकार समोर आला असून कृष्णा सहकारी साखर कारखाना लि. रेठरे बु. या कारखान्यातून हे मळीयुक्त सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे.
राजरोसपणे नदीत हे मळीमिश्रीत सांडपाणी नाल्यातून सोडले जात असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र गांधारीच्या भूमिकेत असून याकडे प्रदूषण मंडळाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचाही नागरिकांचा आरोप आहे.
कृष्णा नदीत नदी काठच्या कारखान्यातून सातत्याने मळीमिश्रीत सांडपाणी सोडले जात असल्याचा आणि यातून नदीचे प्रदूषण आणि मासे मरण्याच्या घटना सातत्याने घडलेल्या आहेत.
असे असताना देखील आजही अनेक कारखान्यामधील मळीमिश्रीत सांडपाणी कृष्णा नदीत सरार्सपणे सोडले जात असल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.
वाळवा तालुक्यातील कोळे गावच्या हद्दीत अनेक नाल्यातून कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे मळीमिश्रीत सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचे समोर येत आहे.
यामुळे कोळे गावाला मळी मिश्रित दूषित पाण्याचा पुरवठा तर होतोय शिवाय या सांडपाणीमुळे इथल्या पिकांवर देखील परिणाम होतोय.
कोळे गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा प्रदूषित होत होण्याबरोबरच लोकांच्या आरोग्याच्याविषयी समस्या उद्भवत आहेत.
यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाला नाल्यातून नदीत सोडले जाणारे हे मळीमिश्रीत सांडपाणी दिसत नाही का असा प्रश्न नागरिक करत आहेत.