Sangli News : संभाजी भिडेंविरोधात इस्लामपूर बंदला संमिश्र प्रतिसाद, अटकेच्या मागणीसाठी काढला मोर्चा

संभाजी भिडेंविरोधात सांगलीच्या इस्लामपूरमध्ये विविध पुरोगामी संघटनांनी इस्लामपूर शहर बंदची हाक दिली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केला आहे,त्या विरोधात राज्यभर संतप्त पडसाद उमटत आहेत.

संभाजी भिडेंच्या निषेधार्थ इस्लामपूर शहरातल्या विविध सामाजिक,पुरोगामी संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्रित येत शहर बंद पुकारला.
इस्लामपूर शहरामध्ये बंदला संमिश्र असा प्रतिसाद मिळाला.
भिडेंचा निषेध आणि त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी यावेळी विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने शहरातून मोर्चा देखील यावेळी काढण्यात आला.
संभाजी भिंडेंना आता सांगली जिल्ह्यातूनही कडाडून विरोध होऊ लागला आहे.
संभाजी भिडे यांनी अलीकडेच महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, शिर्डीचे साईबाबा, स्वातंत्र्य दिन, राष्ट्रगीत व राष्ट्रध्वज याबाबत बुद्धिभेद करणारी व अवमानकारक विधाने केली आहेत.
संभाजी भिडे आणि वादग्रस्त विधान करणाऱ्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात पुरोगामी संघटना 13 ऑगस्टपासून आंदोलनाची चळवळ सुरू करणार आहेत.
13 ऑगस्ट रोजी सांगलीमधील महात्मा गांधी पुतळ्यासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलनाची घोषणा करत विषारी आणि विकृत प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी 13 ऑगस्टपासून चळवळ सुरू करण्याचा पुरोगामी नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाला आहे.
सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पुरोगामी नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.