सांगलीतील आटपाडीत आंदोलन, आमदार, खासदारांना वाहिली श्रद्धांजली, फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

Sangli News: जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात आंदोलन केलं जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सांगलीतील आटपाडीतही या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढण्यात आलेला.
या मार्चात खासदारांना आणि आमदारांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मोर्चात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
आटपाडी येथे आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बंदचं आवाहन करण्यात आलं होतं.
यावेळी आंदोलकांनी आटपाडीत आमदार-खासदारांना श्रद्धांजली वाहिली.
जालनातील सराटी घटनेचा निषेध व्यक्त करत, गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.