Sangli: कृष्णा नदीपात्रात होड्यांच्या शर्यतीचा थरार

सांगली (Sangli) जिल्ह्यातील मिरजमधील कृष्णा नदीच्या (krishna river) पात्रात भव्य होड्यांच्या शर्यती (boat race) पार पडल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव सागर व्हनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या 11 होडी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीनं आणि थरारक अशा पार पडलेल्या होडीच्या शर्यती पाहण्यासाठी कृष्णा काठावर हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.
कृष्णा नदीमध्ये पार पडलेल्या या थरारक होडी शर्यतीमध्ये मिरज तालुक्यातल्या कवठेपिरान येथील सप्तर्षी बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
पावसाळा सुरु झाला की सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये होड्यांच्या शर्यतींचा थरार रंगत असतो.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात कृष्णा नदी दुथडी भरुन वाहत आहे. या स्पर्धेमध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या 11 होडी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
अत्यंत चुरशीने आणि थरारक अशा पार पडलेल्या होडीच्या शर्यती पाहण्यासाठी कृष्णा काठावर हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.
नदी पात्रात तीन किलोमीटर अंतराच्या चार फेरी मारण्याच्या शर्यतीत मिरज तालुक्यातल्या कवठेपिरान येथील सप्तर्षी बोट क्लबने पहिला क्रमांक पटकावला तर समडोळी बोट क्लबने दुसरा आणि तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी यांनी तिसरा क्रमांक पटकावला.
केवळ पश्चिम महाराष्ट्रात सांगलीमध्येच कृष्णेच्या पात्रात अशा होड्यांच्या शर्यतीचा थरार पाहायला मिळतो
होडी शर्यतीमध्ये विजेत्या संघांना सांगली महापालिकेचे आयुक्त सुनील पवार आणि इतर मान्यवरांच्या रोख रक्कम आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले