Amol Kolhe : 'द न्यू बीजेपी' या पुस्तकावरून अमोल कोल्हेंचा खुलासा; जयंत पाटलांच्या उपस्थितीत काय म्हणाले?
जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने खासदार अमोल कोल्हे यांनी दिलेल्या शुभेच्छा चर्चेत होत्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हे यांनी दोन वेगवेगळी पुस्तके वाचत असलेले फोटो ट्विट करत पुस्तक दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
एक पुस्तक होतं शरद पवार यांच्या भाषणाचे 'नेमकचि बोलणे' आणि दुसरं पुस्तक होतं नलिन मेहता यांचे 'द न्यू बीजेपी' होते.
यामधील ''द न्यू बीजेपी' या पुस्तकावरून अमोल कोल्हे यांच्या पुढील राजकीय वाटचालीवर चर्चा सुरू झाल्या होत्या.
यावर स्वतः अमोल कोल्हे यांनीच खुलासा देत अमोल कोल्हे यांना काय सुचवायचे याचे स्पष्टीकरण दिले.
विचारधारा कोणतीही असली, तरी तिचा विरोध करायचा असल्यास आधी अभ्यास करावा लागतो, असे अमोल कोल्हे म्हणाले.
इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या सत्कार कार्यक्रमात अमोल कोल्हे बोलत होते.
इस्लामपूरमध्ये अण्णासाहेब डांगे यांना पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने डी. लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
याबद्दल राष्ट्रवादीकडून इस्लामपूरमध्ये त्यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील समाजात धनगर समाजाला काय किंमत? समाजालाच किंमत नसेल तर फेटा बांधून कशाला मिरवायचं? अशी जाहीर नाराजी माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केली.