Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli News; कृष्णा नदीच्या बचावासाठी सांगलीमध्ये मानवी साखळी आंदोलन
प्रदुषणाच्या विळख्यात अडकलेल्या कृष्णा नदीच्या बचावासाठी आज सांगलीमध्ये मानवी साखळी आंदोलन करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमानवी साखळी आंदोलनात सांगली शहरासह नदीलगतच्या गावातील विविध सामाजिक संघटना तसेच पर्यावरण प्रेमी संघटना सहभागी झाल्या.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि शेतकरी संघटनेचे उमेश पाटीलही या मानवी साखळी आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी कृष्णामाईच्या बचावासाठी पंचसूत्री घेऊन रस्त्यावर उतरण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
साखर कारखान्यांकडून होत असलेले प्रदुषण कृष्णा नदीच्या मुळावर उठले आहे.
त्यामुळे नदीसह नदीकाठचा गावांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
गेल्या महिनाभरात नदीत लाखो माशांनी तडफडून जीव सोडला आहे.
नदीच्या पाण्यातील ऑक्सिजन कमी झाल्याने माशांचा तडफडून मरत आहेत.
त्यामुळे पिण्याचा पाण्याचाही प्रश्न गंभीर होत चालला आहे.
या पार्श्वभूमीवर सांगलीकर जनता रस्त्यावर उतरली.