Pathaan : 'पठाण'साठी सांगलीच्या चाहत्यांनी अख्खं थिएटर केलं बुक! 'पठाण'मय वातावरणाने किंग शाहरुख खानही भारावला

पठाण चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या शोसाठी सांगलीच्या चाहत्यांनी अख्खं थिएटर बुक केलं आहे. शाहरुखनेही प्रतिक्रिया देताना थँक्यू आणि तुम्हाला हा चित्रपट आवडेल, अशी आशा बाळगतो असे म्हटलं आहे.

for Pathaan movie sangli srk universe booked full auditorium

1/10
अभिनेता शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
2/10
अनेक शहरांमध्ये पठाणच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.
3/10
सांगलीमधील शाहरुखच्या काही चाहत्यांनी पठाण चित्रपटाच्या एका शोचं अॅडव्हान्स बुकिंग केलं आहे.
4/10
पठाण हा चित्रपट पाहण्यासाठी सांगली एसआरके युनिव्हर्स या फॅन क्लबनं अख्खं ऑडिटोरियम बुक केलं आहे.
5/10
एसआरके (SRK) वासिम या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट शेअर करण्यात आलं आहे.
6/10
या ट्वीटमध्ये काही मुलं हातात पठाण चित्रपटाची तिकीटं घेऊन पठाणच्या पोस्टरसमोर थांबलेली दिसत आहेत.
7/10
या ट्विटला देण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "सर, प्लीज हे पाहा, आम्ही पूर्ण ऑडिटोरियम बूक केलं आहे. पठाण चित्रपट बघण्यासाठी सांगली एसआरके युनिव्हर्स तयार आहे."
8/10
शाहरुखचे चाहते आता पठाणच्या 'फर्स्ट डे फर्स्ट शो'ची जय्यत तयारी करत आहेत.
9/10
SRK युनिव्हर्स हा शाहरुखचा फॅन क्लब भारतातील 200 हून अधिक शहरांमध्ये 'पठाण'च्या फर्स्ट डे फर्स्ट शोचे आयोजन करणार आहे.
10/10
या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग पाहता हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे.
Sponsored Links by Taboola