Sangli News : सांगली मार्केट यार्डमध्ये 50 किलो साखरेचं पोतं घेऊन 1 किमी धावण्याची अनोखी स्पर्धा
सांगलीमधील मार्केट यार्डमध्ये हमालांच्या अनोख्या स्पर्धा पार पडल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयार्डात 50 किलो साखरेचे पोते घेऊन 1 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धा पार पडल्या.
कमीत कमी वेळात अंतर पार करण्याच्या या स्पर्धेत सुमारे 14 हमाल बांधवांनी सहभाग घेतला.
ज्यामध्ये 50 किलो साखरेचे पोतं घेऊन एक किलोमीटरमध्ये धावण्याच्या या स्पर्धा अत्यंत चुरशीने पार पडल्या.
स्पर्धा पाहण्यासाठी हजारो हमाल बांधव यावेळी उपस्थित होते.
माथाडी कामगार नेते स्वर्गीय बापूसाहेब मगदूम आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हा हमाल पंचायत संघाच्या वतीने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेत आरगच्या भारत खांडेकरने एक किलोमीटरचे अंतर 3 मिनिट 49 सेकंदात पार करून पहिला क्रमांक पटकावला.
कोल्हापूरच्या श्रवण चंद्रकांत पाटीलने 3 मिनिट 57 सेकंदात अंतर पार करून दुसरा क्रमांक पटकावला.
हमालाचे आरोग्य दणकट राहावे, जनजागृती व्हावी या उद्देशाने सांगली मार्केट यार्डात या स्पर्धा घेण्यात येतात
कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच उत्साहाने स्पर्धा उत्साहात पार पडली.