सांगली : विक्रीला ठेवलेल्या फ्रीजमधील सिलिंडरचा स्फोट अन् क्षणात अवघं कुटुंब उद्ध्वस्त, हसत्या खेळत्या कुटुंबाचा सत्यानाश
Sangli Fire: सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात वाटणारी आग आसपासच्या लोकांनी विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, बघता बघता या आगीने रौद्र रूप धारण केले होते
Continues below advertisement
Sangli Fire
Continues below advertisement
1/10
सांगलीच्या विट्यात इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री करणार्या दुकानात फ्रिजच्या सिलेंडरचा स्फोट झाला.
2/10
या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठार झाल्याची घटना घडली.
3/10
यामध्ये 2 पुरूष, 1 महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे.
4/10
या भीषण आगीत दुकानमालक विष्णू पांडुरंग जोशी (वय 47), त्यांची पत्नी सुनंदा विष्णू जोशी (वय 42), मुलगी प्रियांका योगेश इंगळे (वय 25) आणि नात सृष्टी योगेश इंगळे ( वय 2) या चौघांचा होरपळून मृत्यू झाला.
5/10
दुकानमालक मयत विष्णू पांडुरंग जोशी यांचे विट्यात जुना वासुंबे रस्त्यावर स्टिल व इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीचे दुकान आहे.
Continues below advertisement
6/10
खाली दुकान असून मयत हे पहिल्या मजल्यावर राहण्यास होते. कुटुंबातील मनीष जोशीचे लग्न अवघ्या सहा दिवसांनी म्हणजे 16 तारखेला होते.
7/10
दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या फ्रिजमधील सिलेंडरचा अचानक स्फोट झाला.
8/10
स्फोट इतका भीषण होता की यामध्ये संपूर्ण इमारत जळून खाक झाली.
9/10
या घटनीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.
10/10
परंतु यामध्ये चौघांना होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेमुळे विट्यात हळळळ व्यक्त होत आहे.
Published at : 10 Nov 2025 02:26 PM (IST)