Demonetisation : सांगली जिल्हा बँकेसह 8 जिल्हा बँकांमध्ये 101 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा अजूनही पडून!
कोट्यवधी रुपयांच्या जुन्या नोटांचे करायचे काय? असा प्रश्न सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राज्यातील आठ जिल्हा बँकेच्या प्रशासनासमोर पडला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकारण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसह 8 जिल्हा बँकेत 101 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा नोटबंदीनंतर अजूनही पडून आहेत.
कोट्यवधी रुपयांच्या जुन्या नोटांचे (Demonetisation) करायचे काय? असा प्रश्न सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राज्यातील आठ जिल्हा बँकेच्या प्रशासनासमोर पडला आहे. कारण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसह 8 जिल्हा बँकेत 101 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा नोटबंदीनंतर अजूनही पडून आहेत.
सांगलीच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत जुन्या नोटांमधील 500 रुपयांच्या नोटांची थप्पी लागली आहे.
नोटाबंदीनंतर गेली पाच वर्षे महाराष्ट्रात 8 जिल्हा बँकांत जवळपास 101 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पडून आहेत.
बँकांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असली, तरी अद्याप त्यावर काहीच निर्णय न झाल्याने या बँकांना वर्षाला कोट्यवधींचा फटका बसत आहे.
दुसरीकडे त्या नोटांची काळजी घेण्याची जबाबदारी देखील बँकांना खर्च करावा लागत आहे.
8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 व 1 हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या.
बहुतेक जिल्हा बँका या अडचणीत आहेत. त्यांना तातडीने पैशांची गरज आहे. पैसे पडून असल्याने बँकांना फटका बसत आहे.
कोट्यवधींची रक्कम पडून असल्याने त्याच्या व्याजापासून देखील बँकांना मुकावे लागत आहे. त्यामुळे या नोटा लवकर बदलून मिळले तर बँकेचे अर्थचक्र सुरळीत लागायला मदत होणार आहे.