Shirdi Sai Temple : नववर्षाच्या स्वागतासाठी साईनगरी सजली, शिर्डीत साईभक्तांची अलोट गर्दी
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत साईभक्तांची अलोट गर्दी झालीय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर साई भक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता साई संस्थानकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झालेली आहे.
सगळ्या भक्तांना साई दर्शन घेता यावं यासाठी आज रात्रभर साई मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतलाय.
नवीन वर्षाचे स्वागताला भाविकांनी गर्दी केली असून बेंगलोर येथील देणगीदार साईभक्त श्री.बी.ए.बसवराजा यांच्या देणगीतुन साईबाबा समाधी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
नवनर्षानिमित्त साई समाधी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
चावडी तसेच द्वारकामाई या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
आज सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या असून साई नामाच्या जयघोषाने साईनगरी दुमदुमून गेली आहे.