Ram Mandir: अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचे नवे फोटो, पाहा कसं तयार होतयं हे राम मंदिर
अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑक्टोबर 2023 पर्यंत पहिल्या मजल्याचे बांधकाम पूर्ण होईल आणि जानेवारी 2024 मध्ये मकर संक्रांतीनंतर कोणत्याही शुभ मुहूर्तावर भगवान राम मंदिरात विराजमान होतील
रामाच्या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर अनेक भाविक या मंदिरात येऊन पूजाअर्चा करणार आहेत.
भाविकांची वाढती संख्या पाहता श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने राम मंदिरापर्यंत जाण्यासाठी ३ मार्ग तयार केले आहेत.
रामपथ, जन्मभूमी पथ, भक्तीपथ या 3 मार्गांवरून भाविक रामाच्या मंदिरात पोहोचतील.
रामाचे हे मंदिर इतके सुंदर बनवले जात आहे की ते तयार झाल्यावर भक्तांच्या मनाला नक्कीच भुरळ घालेल.
बन्सी पहारपूरच्या दगडांनी रामाचे मंदिर कसे बांधले जात आहे हे या चित्रांमध्ये तुम्ही पाहू शकता.बन्सी पहारपूरचा दगड दिसायला अतिशय मजबूत आणि सुंदर मानला जातो.हा दगड हलका गुलाबी रंगाचा आहे.
यासोबतच हे मंदिर इतके मजबूत बनवले जात आहे की, भविष्यात कधीही भूकंप झाला तर कोणत्याही प्रकारे मंदिराचे नुकसान होऊ शकणार नाही.