Vajir Sulka: वजीर सुळक्यावर जिद्दी क्लायंबर्स टीमची यशस्वी चढाई
ठाणे जिल्ह्यातील आसनगाव जवळ असणा-या माहुली किल्ल्याच्या जवळ वजीर नावाचा अजस्र सुळका सर करण्याचे काम जिद्दी क्लायंबर्सच्या टीमने केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सुळक्याची उंची 250 फुट आहे. माहुली किल्ला हा समुद्र सपाटीपासून 2 हजार 800 फूट आहे.
250 फूट उंच असलेला वजीर सुळका सर करण्यासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो.
त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी वांद्रे गावातून तीन तासांची अतिशय दमछाक करणारी पायपीट करावी लागते.
दुर्गम परिसर,उंच टेकड्या,घनदाट जंगल,निसरडी वाट दोन्ही बाजूने खोल दरी,पाठीवर ओझे, सुळक्याच्या पूर्वेकडील दरीचा उतार जवळपास सहाशे फूट आणि पाण्याची प्रचंड कमतरता आहे.
त्यामुळे या सुळक्यावर ट्रेकिंग करायचं ठरवलं आणि इकडचा पाय तिकडे पडला तर थेट दरीच्या जबड्यातच विश्रांती.
15 जानेवारी रोजी वजीर सुळका यशस्वीरित्या पूर्ण केला.याआधीही वजीर सुळका मोहिम जिद्दीच्या टिमने यशस्वीपणे पार पाडली होती.
सह्याद्रीतील सर्वात उंच सुळका बाण वर लवकरच चढाई करण्याच्या दृष्टीकोनातून वजीर या सुळक्यावर जिद्दीच्या टिमने प्रॅक्टिस म्हणून चढाई केली.
यामध्ये जिद्दी क्लायंबर्स टिमचा सर्वात छोटा 10 वर्षाचा क्लायंबर सृजन सतीश पटवर्धन याने देखील या सुळक्यावर यशस्वी चढाई केली.
या चढाईच्या दिवशी कु.सृजन सतीश पटवर्धन याचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवसही सुळक्याच्या माथ्यावर साजरा केला गेला
या मोहिमेत अरविंद नवेले,प्रसाद शिगवण,सतीश पटवर्धन,आकाश नाईक,दिनेश आगरे भवन्स कॉलेज(वनस्पती शास्त्र) प्राध्यापक मिलिंद मोरे आणि नेवी कमांडर विपुल यांचा समावेश होता.