कोकणात दरडी कोसळल्या, रेल्वे ट्रॅकवरच मोठमोठे दगड; जनशताब्दीसह अनेक रेल्वेगाड्या अडकल्या

राज्यातील कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.

Continues below advertisement

Kokan railway rain update

Continues below advertisement
1/8
राज्यातील कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.
2/8
कोकणासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचे आगामन झाल्याचं पाहायला मिळालं. तळकोकणातही पावसाने धुव्वाधार बॅटींग केली असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
3/8
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसला असून कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या रेल्वे ट्रॅकवरच अडकून पडल्या आहेत.
4/8
कोकण रेल्वे मार्गावर वेरवली-विलवडे स्टेशन दरम्यान दरड कोसळल्याने रेल्वेमार्ग बंद झाला आहे. त्यामुळे, कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून आज संध्याकाळची ही घटना आहे.
5/8
रेल्वे ट्रॅकवरच दरडी कोसळल्याने रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबून आहेत, प्रशासनाकडून तातडीने दरड हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. जवळपास दीड तास कोकण रेल्वे उशिराने धावणार आहेत
Continues below advertisement
6/8
गोव्याच्या दिशेने नेत्रावती एक्सप्रेस रत्नागिरीत थांबून असून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेसही वैभववाडीत थांबून आहे, मुंबईकडे जाणारी तेजस एक्सप्रेस कणकवलीमध्ये थांबून आहे.
7/8
कोकणातील वैभववाडी रेल्वे स्थानकावर प्रवासी अडकून पडले असून काही प्रवाशी रेल्वेगाड्या ट्रॅकवरच असल्याने ताटकळत बसले आहेत.
8/8
दरम्यान, साताऱ्यात मोबाईल टॉवर कोसळून वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे पाहायला मिळालं आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Sponsored Links by Taboola