Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO : खेडमधील रघुवीर घाटाची विहंगम दृश्ये
खेड जिल्ह्यातील रघुवीर घाटाचे सौंदर्य पावसामुळे अधिकच खुलले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरत्नागिरी आणि सातारा यांना जोडणारा आणि खेड तालुक्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असणारा रघुवीर घाट.
रघुवीर घाट हा पावसाळ्यातील मोठं पर्यटन स्थळ आहे.
या घाटामध्ये तालुक्यातील तसेच बाहेरील अनेक पर्यटक वर्षा पर्यटनासाठी याच महिन्यापासून हजेरी लावतात.
एका बाजूला खोपी गाव आणि खोपीचे धरण आणि याच धरणाच्या वरच्या बाजूला उंचीवर घाट मार्ग
या घाटात पावसात प्रवाहित होणारे धबधबे, थंड वातावरण आणि धुक्याची दाट चादर ही वैशिष्ट्ये पर्यटकांना भुरळ घालते.
मात्र या घाटाचा रस्ता हा गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे खचला आहे. त्यामुळे चालत्या वाहनांवर दरड कोसळण्याचे प्रकार घडण्याची शक्यता आहे.
परिणामी वाहनांना अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने सध्या घाट बंद ठेवण्यात आला आहे.
घाट बंद असला तरी आम्ही तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून रघुवीर घाटाची खास दृश्ये दाखवत आहोत.