PHOTO : जमीन मालक विद्यार्थ्यांच्या आडवा, शाळेचा पहिला दिवस भरपावसात
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज शाळेची पहिली घंटा वाजली. पहिली ते दहावीच्या शाळा आजपासून सुरु झाल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील अनेक शाळांमध्ये फुलं आणि फुग्यांच्या सजावटीने तसंच लेझीम, ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.
परंतु रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील रायपाटण गावातील विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस फारसा चांगला नव्हता.
शाळेच्या पहिल्याच दिवशी जमीन मालकाने विद्यार्थ्यांचा मार्ग अडवून धरला.
शाळेच्या जमिनीवर जमीन मालकाने दावा केल्याने विद्यार्थ्यांना भरपावसात शाळेबाहेरचं उभे राहावं लागलं.
जिल्हा परिषदेची शाळा माझ्या जागेत आहे. मी कुणाला जाऊ देणार नाही, असं म्हणत संबंधित जमीन मालकाने कुंपण देखील घातलं आहे.
पण असं असलं तरी शाळेच्या इमारतीचा सात बारा जिल्हा परिषदेच्या नावावर आहे, अशी माहिती तंटामुक्ती अध्यक्षाने दिली आहे.