Ganesh Chaturthi 2022 : चिपळूणमध्ये 'बाबा मला मारु नका' या संकल्पनेवर आधारित सामाजिक संदेश; जिवंत देखाव्यातून जनजागृती
महाराष्ट्रापासून देशभरात सध्या गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया निमित्ताने घरोघरी तसेच सार्वजनिक गणपती मंडळात देखाव्या बरोबरच सामाजिक संदेशही देण्यात येतोय.
चिपळूणमधील महर्षी आण्णासाहेब कर्वे मित्र मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सवात असाच एक सामाजिक संदेश देणारा अनोखा देखावा सादर केला आहे.
'बाबा मला मारु नका' या संकल्पनेवर आधारित जिवंत देखाव्यातून अनोख्या पद्धतीने जनजागृती या मंडळाने केली आहे.
या देखाव्यातून अनोख्या पद्धतीने जनजागृती करत ज्वलंत विषयावर सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारा हा देखावा आहे.
वंशाला दिवा पाहिजे म्हणून अनेकांना मुलगा व्हावा अशी अपेक्षा असते.
त्यासाठी देवधर्म, नवस, प्रसंगी अघोरी कृती देखील केली जाते.एवढेच नाही तर स्त्रीभुषण हत्याही केली जाते.
या जिवंत देखाव्याच्या माध्यमातून हा ज्वलंत सामाजिक प्रश्न या देखाव्याने प्रकाशझोतात आणला आहे.
हा देखावा पाहण्यासाठी चिपळूणकरांकडून उत्तम प्रतिसादही मिळत आहे.
महर्षी आण्णासाहेब कर्वे मित्रमंडळाकडून गणेशोत्सवात गेली 42 वर्ष पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा विविध विषयांवर देखावे सादर केले जातात.