PHOTO : रिफायनरीविरोधात स्थानिक आक्रमक, आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, महिला जखमी
कोकणातील रिफायनरीला (Refinery) स्थानिकांचा विरोध कायम आहे. राजापूर तालुक्यातील गोवळ गावातमधील सर्व्हे आणि माती परीक्षण रोखण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे. सर्व्हे सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे ड्रोन आणि माती परीक्षणासाठी पोलिसांनी फौज फाटा तैनात केला आहे. परंतु,यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आंदोलकांनी आरोप केलाय.
राजापूर तालुक्यातील गोवळ गावात आज सर्व्हे कण्यात येणार आहे. परंतु, स्थानिकांनी या सर्व्हेला जोरदार विरोध केला आहे.
सर्व्हे सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले आणि सर्व्हे रोखण्यात यावा अशी मागणी केली.
पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्व्हे रोखण्यात न आल्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.
कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी पोलिसांकडून फौज फाटा तैनात करण्यात आलाय. शिवाय आंदोलकांची भूमिका पाहता पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली आहे.
आंदोलनादरम्यान एक महिला जखमी झाली असून त्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.