गणपतीपुळेला जाताय, मग हा बोर्ड आधी वाचा; भाविकांना ड्रेसकोड लागू, पूर्ण पोशाख परिधान करावा

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध मंदिरात ड्रेसकोड लागू करण्यासंदर्भाने विचार केला जात आहे. तर, काही मंदिरात तसा प्रयत्न देखील झाला आहे.

Ganpatipule temple dresscode

1/7
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध मंदिरात ड्रेसकोड लागू करण्यासंदर्भाने विचार केला जात आहे. तर, काही मंदिरात तसा प्रयत्न देखील झाला आहे.
2/7
मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात 30 जानेवारी 2025 पासून ड्रेसकोड लागू करण्यात आलाय. आता, कोकणातील प्रसिद्ध निसर्गरम्य ठिकाण आणि देवस्थान असलेल्या गणपतीपुळे मंदिरातही भाविकांना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे.
3/7
गणपतीपुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी अखेर ड्रेसकोड लागू करण्यात आला असून भाविकांसाठी वेशभूषा नियमावली जाहीर झाली आहे.
4/7
गणपतीपुळे महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनाकडून वेशभूषेसंदर्भात व नव्या ड्रेसकोड प्रणालीसंदर्भात बोर्ड लावण्यात आला आहे. त्यामुळे, आता भाविकांना पूर्ण पोशाख परिधान करुनच मंदिरात यावे लागेल.
5/7
मंदिर प्रशासनाने भाविकांना वेशभूषेसंबंधी नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. कमी कपड्यातील ट्रीप मूड अथवा समुद्रावर जाण्यासाठी करण्यात येणारा पेहराव टाळण्याचं आवाहन देखील मंदिर प्रशासनाने केलंय.
6/7
महिला किंवा मुलींसाठी गुडघ्यांच्या वर येणारे स्कर्ट्स किंवा शॉर्ट ड्रेसेस परिधान करू नयेत, असभ्य भाषा किंवा आक्षेपार्ह चित्र असलेले कपडे टाळावे असेही सांगण्यात आलय.
7/7
आक्षेपार्ह भाषा किंवा चित्र असलेल्या, तोकड्या अशा कपड्यातील मंडळींना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश निषिद्ध असेल, त्याकरिता आम्हाला भीड घालू नये. केवळ 10 वर्षांच्या आतील मुलांना ह्या नियमातून सूट असेल, असेही मंदिर प्रशासनाने म्हटलं आहे.
Sponsored Links by Taboola