PHOTO : दापोलीत समुद्राला उधाण; नारळ, सुपारीची झाडे जमीनदोस्त
दापोली तालुक्यातील मुरुड येथे समुद्राला उधाण आल्याने नारळ, सुपारीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमुद्रकिनाऱ्यांना धूपप्रतिबंधक बंधारे नसल्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या उधाणात समुद्रालगत असणाऱ्या बागायती शेतीचे नुकसान झाले आहे.
किनाऱ्यावरील नारळी, सुपारीच्या बागा जमीनदोस्त झाल्या असून उधाणाचे पाणी भात शेतीत शिरल्याने शेतीचेही मोठ नुकसान झाले आहे.
गेले काही दिवस किनारी भागात सातत्याने लाटांचे तांडव पाहायला मिळत आहे.
वेगाने आलेल्या लाटांनी नारळाची झाडे उन्मळून पडली. किनाऱ्यावर असलेल्या रिसॉर्टचेही मोठे नुकसान झाले आहे.
मुरुड समुद्रकिनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा, अशी बागायतदारांची अनेक वर्षांची मागणी आहे.
परंतु प्रशासनाकडून याकडे डोळेझाक होत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.
मुरुड गाव पर्यटनांसाठी प्रसिद्ध आहे. येथील किनाऱ्यावरील नारळ, पोफळीच्या बागा, उंच वाढणारे सुरु पर्यटकांचे आकर्षण ठरतात.
परंतु या बागा आता समुद्राच्या उधाणामुळे उन्मळून जमीनदोस्त होत आहे