Alphonso Mango : हापूस आंब्यासमोर संकटांची मालिका; उष्माघातामुळे फळगळ

कोकणचा हापूस आंबा जगात प्रसिद्ध. अगदी इंग्लंडच्या राणीने देखील हापूसची चव चाखल्यानंतर ती त्याच्या प्रेमात पडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पण याच हापूस समोर सध्या संकटांची मालिका उभी आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.

उशिराने आलेला मोहर, मग थ्रिप्स आणि तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव आणि आता उष्माघातामुळे फळगळ, यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
लांबलेला पावसाळा आणि उशिराने सुरु झालेली थंडी यामुळे हापूस काहीसा उशिराने मोहरला.
मोहरला. त्यानंतर देखील या मोहरावर थ्रिप्स आणि तुडतुडा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला. परिणामी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागली.
अशा परिस्थितीमध्ये काही प्रमाणात का असेना हापूस हाताशी लागेल अशी आशा इथल्या शेतकऱ्यांना होती. पण सध्या वातावरणात उष्मा वाढला असून त्याचा परिणाम आता हापूसवर जाणवत आहे.
कारण सध्या झालेल्या फळधारणापैकी जवळपास 75 टक्के हापूस हा गळून पडत आहे.
परिणामी कोकणातला शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. अशा या परिस्थितीमध्ये तो मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता देखील आहे.
त्यामुळे आता या वातावरण बदलाचा अभ्यास अभ्यासकांनी करावा आणि त्यातून किमान काय मार्ग असेल तर सुचवावा, अशी मागणी हा शेतकरी करत आहेत.