मालवणचा राजकोट किल्ला उघडला, शिवरायांचा विशाल पुतळा पुन्हा पाहता येणार!
दोन महिन्यांच्या दुरुस्तीनंतर मालवणमधील राजकोट किल्ला पर्यटकांसाठी उघडला आहे.
Rajkot Fort, Sindhudurg
1/7
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील ऐतिहासिक राजकोट किल्ला तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.
2/7
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या सभोवतालचा पदपथ खचल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी २२ जूनपासून किल्ला बंद ठेवण्यात आला होता.
3/7
या कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पदपथ दुरुस्ती व अन्य आवश्यक कामे करण्यात आली.
4/7
पावसाळ्यात सिंधुदुर्ग किल्ला बंद असल्याने पर्यटकांसाठी राजकोट किल्ला आणि शिवपुतळा हे मोठे आकर्षण ठरतात.
5/7
मात्र दुरुस्तीमुळे पर्यटकांना या ठिकाणापासून दोन महिने दूर राहावे लागले.
6/7
अखेर काम पूर्ण झाल्यानंतर किल्ला पुन्हा खुला करण्यात आला आहे.
7/7
पर्यटकांनी किल्ला खुला होताच मोठ्या संख्येने हजेरी लावण्यास सुरुवात केली असून परिसर पुन्हा गजबजला आहे.
Published at : 11 Sep 2025 10:29 AM (IST)