Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : 19 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर महाराष्ट्राच्या मनातलं सत्यात अवतरलं; अखेर उद्धव-राज ठाकरे एकाच मंचावर; विजय मेळाव्याला अलोट गर्दी

वरळी डोममधल्या मंचावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी राज्यासह देशाच्या कोनाकोपर्‍यातून मनसेसैनिक, शिवसैनिक आणि मराठीप्रेमी उपस्थित झाले होते.

Continues below advertisement

raj thackeray uddhav thackeray rally crowd

Continues below advertisement
1/7
मनसेचे नेते अमित ठाकरे आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे चुलत भाऊ देखील मराठीच्या मुद्द्यावरुन आयोजित विजय जल्लोष मेळाव्यासाठी एकत्र आले. यावेळी, दोन भावांना जवळ घेऊन फॅमिली फोटो फ्रेम देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
2/7
विशेष म्हणजे या सोहळ्यात केवळ ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच एकत्र आले नाही, तर ठाकरे कुटुंबीय एकत्र पाहायला मिळाले. ठाकरेंची चौथी पिढीही व्यासपीठावर एकत्र दिसून आली.
3/7
जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायला, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, अशी मार्मिक टिप्पणी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली.
4/7
तर बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर आज भेट झाली. आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला आहे. आता अक्षदा टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
5/7
तर दुसरीकडे अखेर महाराष्ट्राच्या मनातलं स्वप्न खरं झालं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची वरळी डोममध्ये थाटात एन्ट्री करत या एन्ट्रीला आपले ठाकरे गाणं वाजलं आणि फक्त वरळी डोमच नाहीतर अख्खा महाराष्ट्राच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले.
Continues below advertisement
6/7
वरळी डोममधल्या मंचावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकाचवेळी एन्ट्री घेतली. दोन्ही भावांनी एकमेकांना मिठी मारली आणि मंचावरुन अवघ्या महाराष्ट्राला अभिवादन केलं. हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी राज्यासह देशाच्या कोनाकोपर्‍यातून मनसेसैनिक, शिवसैनिक आणि मराठीप्रेमी उपस्थित झाले होते.
7/7
यावेळी मराठी हुंकाराने वरळी डोम तासभर आधीच तुंडूब भरला होता. तर बाहेर गेटवरही हजारोंचा जमाव यावेळी जमला होता. परिणामी वरळी डोमच्या मार्गावर ट्रॅफिक तुंबलेलं बघायला मिळाले.
Sponsored Links by Taboola