Raj Thackeray at Matoshree: राज ठाकरेंची गाडी हॉर्न वाजवत मातोश्रीच्या गेटमधून आत शिरली अन् कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले ठाकरे बंधू आज पुन्हा एकदा एकत्र आल्याचे बघायला मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे हे मातोश्रीवर आले आहेत.

Raj Thackeray at Matoshree

1/5
Raj Thackeray and Uddhav ठाकरे मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. अशातच मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले ठाकरे बंधू आज पुन्हा एकदा एकत्र आल्याचे बघायला मिळाले आहे.
2/5
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्व:ता मनसेप्रमुख राज ठाकरे हे मातोश्रीवर आले आहेत.
3/5
उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर आले आहे. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह दिसून आला. दरम्यान राज ठाकरे हे मातोश्रीवर जाणे हा अनेक अर्थांनी ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.
4/5
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे काही निवडक प्रसंग सोडले तर ते मातोश्रीवर गेले नव्हते. अशातच शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे जेव्हा जेव्हा मातोश्रीवर गेले होते, तेव्हा काहीतरी अपरिहार्य कारण होते. मात्र, आता राज ठाकरे हे पहिल्यांदाच स्वखुशीने मातोश्रीवर आले आहेत. यावेळी त्यांनी फुलांचा बुके देत गळाभेट घेतली आहे.
5/5
राज ठाकरे हे शिवसेनेत असताना अनेकदा मातोश्रीवर जायचे. राज ठाकरे हे लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. त्यांच्याच मुशीत राज ठाकरे यांची जडणघडण झाली होती. त्यामुळे राज ठाकरे हे अनेकदा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मातोश्रीवर असायचे. मात्र, शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे आणि मातोश्रीची ताटातूट झाली होती. मात्र, आता राज ठाकरे हे अनेक वर्षांनी मातोश्रीवर पाऊल ठेवणार आहेत. हा महाराष्ट्रातील राजकारणाच्या नव्या अध्यायाचा श्रीगणेशा ठरण्याची शक्यता आहे.
Sponsored Links by Taboola