Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटात डोंगरावरुन दगड गडगडत आले, कारचं सनरुफ फोडून आत शिरले, स्नेहा गुजराथींनी जागेवरच जीव सोडला

Raigad Tamhini Ghat Accident: रायगडच्या ताम्हिणी घाटात दरड कोसळली, कारचं सनरुफ फोडून दगड महिलेचा डोक्यात पडला, जागेवरच प्राण सोडले. भीषण अपघातामुळे खळबळ

Continues below advertisement

Raigad Tamhini Ghat Accident

Continues below advertisement
1/11
रायगड जिल्ह्यातील अतिशय धक्कादायक बातमी समोर येतेय. रायगडच्या ताम्हिणी माणगाव घाटामध्ये एका आलिशान कारवर आज सकाळी कोंडेथर या गावाजवळ दरड कोसळून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.
2/11
धक्कादायक बाब म्हणजे या आलिशान कार ला असलेल्या सनरूफ मधून दरड मधील एक टोकदार दगड थेट महिलेच्या डोक्यात आदळला आणि या महिलेचा जागीच मृत्यू झाला
3/11
अपघातानंतर या महिलेला जवळच्या मोदी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
4/11
पुण्यावरुन माणगावच्या दिशेने एक गुजराती कुटुंब आपल्या अलिशान कारने प्रवास करत होते.
5/11
ताम्हिणी घाटातील कोंडीथर गावाजवळ एक दरडीचा भाग आहे.
Continues below advertisement
6/11
या दरडीतील दगड-गोटे खाली येऊन कारवर आदळले.
7/11
यापैकी एक दगड सनरुफ तोडून वेगाने आत घुसला. हा दगड चालकाच्या बाजूला बसलेल्या स्नेहल गुजराथी यांच्या डोक्यात आदळला.
8/11
यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यानंतर स्नेहल गुजराथी यांना उपचारासाठी मोदी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते.
9/11
मात्र, क्लिनिकमध्ये नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
10/11
ताम्हिणी घाटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे मुरुम असलेला दरडीचा भाग सैल झाला होता. त्यामुळे डोंगरावरील दगड-गोटे खाली आले.
11/11
या अपघातामध्ये स्नेहन गुजराथी यांचा मृत्यू झाला.
Sponsored Links by Taboola