Shivrajyabhishek Din 2023 : शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह... रायगडावर संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम
स्वराज्याची राजधानी रायगडावर आज 350 वा शिवराज्याभिषेक दिन उत्सव सोहळा संपन्न होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला आहे. संभाजीराजे कुटुंबियांसह रायगडावर दाखल झाले.
350 व्या राज्याभिषेक निमित्ताने मोठ्या संख्येने शिवभक्त गडावर दाखल झाले असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
देशभरातील शिवप्रेमी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर दाखल झाले आहेत.
संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.
350 व्या राज्याभिषेकाचा उत्साह पाहून संभाजीराजे छत्रपती भावुक झाले. मी तर एक निमित्त आहे. शिवभक्तांनी लाखोंच्या संख्येने हजेरी लावली आहे. हा फक्त शिवराज्याभिषेक सोहळा नाही तर उत्सव बनला आहे अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजी राजे यांनी दिली.
संभाजीराजे छत्रपती आणि यशराजे छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण मूर्तीवर अभिषेक करण्यात आला.
वारकरी देखील किल्ले रायगडवर दाखल झाले आहेत. संत तुकाराम महाराजांचे वंशज देहू या ठिकाणाहून किल्ले रायगडवर आले आहेत.. यावेळी त्यांनी कीर्तन सादर केलं.
किल्ले रायगडावर रोपवेसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे गर्दीचा आकडा पाहता गरजवंत किंवा वृद्ध व्यक्तींनीच रोपवेचा वापर करावा असा आवाहन प्रशासनाने केले आहे.
शिवाजी महाराजांचा आजच्या दिवशी राज्याभिषेक झाला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 ला शिवराज्यभिषेक सोहळा पार पडला आणि रयतेचे लाडके शिवबा छत्रपती झाले.