Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीत आजही मदत आणि बचावकार्य सुरु
खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली जीव शोधण्याचा प्रयत्न आजही एनडीआरएफचे जवान करत आहेत. चार तुकड्या घटनास्थळी रवाना पोहोचल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया ठिकाणी स्थानिक प्रशासनाने आता कलम 144 लागू केलं आहे. पोलिसांनी परिसरात बॅरिकेटिंग केली असून अधिकाऱ्यांशिवाय कुणालाही पोलीस सोडत नाहीत
गेल्या तीन दिवसांत एकूण 27 मृतदेह सापडले असून, अद्याप 78 जण ढिगाऱ्याखाली सापडले असल्याची भीती व्यक्त होत आहे.
काल पाच जणांचे मृतदेह काल हाती लागले, त्यांच्यावर घटनास्थळीच अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरड दुर्घटनेत वाचलेले 76 जण आजही घाबरलेल्या स्थितीत आहेत. घडलेल्या प्रसंगातून ते अजून सावरलेले नाहीत.
भविष्यात त्यांच्या मनावर आघात होऊ शकतो. यासाठी मानसोपचारतज्ज्ञांमार्फत त्यांच्या मनातील भीती घालवण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.
रायगडमधील इर्शाळवाडी इथे 19 जुलैच्या रात्री दरड कोसळली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.