PHOTO : रायगडच्या दासगावमध्ये पारंपारिक होडी स्पर्धेचा थरार!

रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी किनारी वसलेल्या दासगाव गावातील खाडीमध्ये रविवारी (8 जानेवारी) होड्यांची स्पर्धा रंगली.

Raigad Boat Competition

1/9
भोई समाजाची ओळख टिकवण्यासाठी 'मी दासगावचा भोई, भोईराज माझा, दर्याचा राजा' या पारंपरिक होडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं.
2/9
गेली अनेक वर्षे होडीवर उदरनिर्वाह करणाऱ्या दासगावकर भोई समाजातील तरुणांनी ही स्पर्धा आयोजित केली होती.
3/9
ग्रामस्थांसह मुंबई आणि अन्य शहरांतील लोकांनी ही स्पर्धा पाहण्यासाठी हजेरी लावली आणि रोमांचक थरार अनुभवला.
4/9
दासगाव बंदरालगत असलेल्या सावित्री नदीपात्रात रंगलेल्या या स्पर्धेत 16 होड्यांचा सहभाग होता.
5/9
मुंबईतील रंगावली संस्कार जोपासना ग्रुप आणि दासगाव भोई समाजाने ही स्पर्धा आयोजित केली होती
6/9
दासगाव हा खाडी परिसर असल्याने भरती-ओहोटीचे ज्ञान आणि होडी चालवण्याचे कसब या परिसरातील भोई समाजातील ग्रामस्थांना चांगलंच आहे.
7/9
जयेश मिंडे, परेश निवाते, आदिनाथ मिंडे यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
8/9
दिपेश निवाते, रुपेश पड्याळ, निखिल निवाते यांनी द्वितीय; तर सुमेश जाधव, प्रणेश निवाते, स्वप्नील जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
9/9
दासगाव बंदरालगत असलेल्या सावित्री नदीपात्रात रंगलेल्या या स्पर्धेत 16 होड्यांचा सहभाग होता.
Sponsored Links by Taboola