PHOTO : नरवीर तानाजींची शस्त्रे ज्या झाडात सापडली ते 350 वर्षांचं विशाल वृक्ष कोसळलं

Tanaji Malusare Tree Raigad

1/5
350 वर्ष ज्याने शिवकाळ अनुभवला, ज्याने दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांचा सहवास अनुभवला तो इतिहासाची साक्ष देणारा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या घराच्या परिसरातील आणि आता नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाजवळ निधड्या छातीने उभं असणारं अवाढव्य वृक्ष कोसळलं. रायगड जिल्ह्यातील उमरठ इथलं हे आंब्याचं झाड होतं.
2/5
कोकणात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या पावसाबरोबर सोसाट्याच्या वाऱ्याने आज (14 जुलै) हे आंब्याचं वृक्ष कोलमडून पडलं. सुदैवाने जवळपास कोणी नसल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. परंतु स्मारक परिसराला असणाऱ्या तटबंदीचे नुकसान झाले आहे.
3/5
मावळाच म्हणावं लागेल असं वृक्ष म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या काळातील आंब्याचे झाड. याच आंब्याच्या ढोलीमध्ये शिवकालीन शस्त्र सापडली होती. उमरठ येथे येणाऱ्या प्रत्येक नरवीर प्रेमींनी हे आंब्याचे झाड आणि त्याच्या ढोलीत सापडलेली तलवार आणि दांडपट्टा पाहिला असेलच.
4/5
या आंब्याच्या झाडाची फळं साखरेप्रमाणे गोड होती, त्यामुळे पंचक्रोशीत या झाडाची साखरगोटी म्हणूनही ओळख होती.
5/5
अखंड 50 वर्षापेक्षा जास्त काळ निधड्या छातीने उभं असलेलं हे झाड आज कोसळल्याने अनेकांनी हळहळ देखील व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचा मावळा हरपल्याची भावना गावकरी व्यक्त करत आहेत.
Sponsored Links by Taboola